भंडारा : धान केंद्र वाटप, भरडाईत तफावत, संस्थांची तपासणी न करणे आदी कारणांमुळे धान घोटाळे होत असतानाही केवळ कागदोपत्री कारवाई करणाऱ्या भंडारा जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण रमेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. 

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्र्यांचे विश्वासू सचिव सुमित वानखेडे यांचा वारंवार होणारा वर्धा जिल्हा दौरा; रहस्य काय, वाचा…

process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Food stalls from IT Park to Mate Chowk have found new ways to avoid legal action
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?

भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला १०० कोटींचा धान घोटाळा उघडकीस आला होता. सीआयडी तपासानंतर हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात धान घोटाळ्याची मालिकाच सुरू झालेली आहे. जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी धान खरेदी आणि भरडाईत तफावत असतानासुद्धा सदर संस्थांचा कोणताही पूर्व इतिहास तपासला नाही. जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी त्या संस्थांवर कोणतीही कारवाई केली नाही. तुमसर तालुक्यातील पिपरा येथे हजारो गोणी धानसाठा पुरात वाहून गेल्याचे प्रकरण पुढे आले होते. परंतु, त्याठिकाणी धानसाठा शिल्लकच नसल्याचे दिसून आले आहे. या संपूर्ण प्रकरणात जिल्हा पणन अधिकारी पाटील यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यांच्या अशा भूमिकेमुळे जिल्हा पणन महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून हलगर्जीपणा आणि दिरंगाई करणाऱ्या संस्थांना गैरव्यवहार करण्यास वाव मिळाला, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा >>> बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मतभेदाची दरी

भंडारा जिल्ह्यातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२१-२२ मध्ये धान खरेदी संस्थांना धान खरेदीचे काम देताना संबंधित संस्थांकडून प्रत्येकी १० रुपये अनामत रक्कम आणि ५० लाख रुपये रकमेचा बोजा घेतला नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पणन महासंघाचे २०,२६,३७,३२६ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. याशिवाय संबंधित आठ खरेदीदार संस्थांकडून धान खरेदी करताना झालेल्या अनियमिततेमध्ये पणन महासंघाचे २८ कोटी ३९ लाख ३१ हजार ३६५ चे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकरणात जिल्हा पणन अधिकारी पाटील यांचा दुर्लक्षितपणा, बेजबाबदारपणा असल्याचे त्यांना महासंघाच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Story img Loader