लोकसत्ता टीम
भंडारा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात भंडारा जिल्ह्याने नागपूर विभागातून दुसऱ्या स्थानावर बाजी मारली आहे.
जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के इतका लागला. यावेळीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून निकालाच्या टक्केवारीत जवळपास पाच टक्के अधिक मुली परीक्षेत पास झाल्या आहेत. जिल्ह्यातील २८४ शाळांमधून एकूण १६ हजार १७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १६ हजार ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. या शाळांपैकी ७१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.