नागपूर: भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणीतील स्फोटात आठ कामगार मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये दिली. मात्र दुपारी चार वाजता भंडारा जिल्हा प्रशासनाने चार मृतकांची नावे जाहीर केली आहेत.
भंडा-याजवळील जवाहर नगर आयुध निर्माणीत सकाळी १० वा स्फोट झाला. तेंव्हापासून या दुर्घटनेत किती कामगार दगावले याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून जाहीर केली नव्हती. त्यामुळे वेगळे आकडे सांगितले जात होते. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात भंडारा प्रशासनाशी संपर्क साधून दुर्घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास भंडारा जिल्हा प्रशासनाने चार मृत कामगारांची तसेच जखमींची यादी जाहीर केली.
मृत कामगार
१)चंद्रशेखर गोस्वामी (५९ वर्षे )
२) मनोज मेश्राम (५५ वर्षे )
३)अजय नागदेवे (५१ वर्षे )
४)अंकित बारई (२० वर्षे )
जखमींची नावे
१)एन पी वंजारी (५५ वर्षे )
२)संजय राऊत( ५१ वर्ष )
३) राजेश बडवाईक (३३ वर्षे )
४) सुनील कुमार यादव( २४ वर्षे )
५) जयदीप बॅनर्जी (४२ वर्षे )
जेथे स्फोट झाला तेथील मलबा उपसण्याचे काम सुरू असून सात ते आठ कामगार दबले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे