भंडारा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मला महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आला होता. पण, मी तो स्वीकारला नाही, असा गौप्यस्फोट भंडाऱ्याचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते माध्यमांसमोर बोलत होते.

हेही वाचा…“मराठा समाजाला धोका दिल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करा” जरांगेंच्या आवाहनाला…

पक्ष नेतृत्वाने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. २०१९ मध्ये काही नेत्यामुळे मला तिकीट मिळाले नाही, यावेळीही मी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली होती. या निवडणुकीसाठी मला महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आला पण, मी तो स्वीकारला नसल्याचा गौप्यस्फोट भंडाऱ्याचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे. महायुतीकडून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले होते . महायुतीसोबत असल्याने मला दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि मला तिकीट दिले, असेही भोंडेकर म्हणाले.