भंडारा : प्रचारसभा आटोपून परत येत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला. भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून यात कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला. नाना पटोले मंगळवारी आपली सुनिश्चित प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या उभ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोठी घटना टळली. नाना पटोले हेदेखील थोडक्यात बचावले.

हेही वाचा – वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचारी ‘घरगडी’! राज्यभरात तीन हजारांवर पोलीस…

हेही वाचा – भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”

अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पुढील तपास सुरू आहे. ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara nana patole car accident a heavy truck collided with a standing car ksn 82 ssb