भंडारा : गावात जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून मध्यरात्रीला घराबाहेर बोलावून एका ४५ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथे घडली. जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव विनिराम गडेराव रहिले असे असून तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी चिचोली येथील अरविंद दादाजी तुमन्ने (वय २८), गुलाब नंदलाल करंडे ( वय ३०) व संतोष केवळराम तुमन्ने (वय ४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : सना खान हत्याकांडात म. प्र. भाजपा नेत्याचा हात, आई मेहरुनिसा खानचा आरोप
घटनेच्या रात्री विनिराम घरी झोपलेला असताना गुलाब करंडे याने खाजगी कामाचा बहाणा करून त्याला घराबाहेर बोलाविले व जादूटोणा केल्याच्या संशयावरून विनिरामला मारहाण केली. यावेळी विनिरामच्या घराजवळ असलेल्या अन्य दोन व्यक्तींनीदेखील त्याला मारपीट केल्याचा आरोप केला आहे.