मद्याच्या आहारी गेलेल्यांचा राग मुक्या जनावरांना देखील येत असल्याची प्रचिती भंडारा जिल्ह्यात आली. मद्यधुंद मालकाला संतापलेल्या बैलाने चांगलाच इंगा दाखविल्याची घटना घडली.
बैलाने शिंगावर घेऊन दारुड्या मालकाला उचलून फेकले. यामुळे, मालकाची चांगलीच नशा उतरली असल्याचे दिसत आहे. बैलपोळ्याचा दिवशी हा प्रकार घडला असून या भन्नाट घटनेचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
हेही वाचा – बुलढाणा : बेलगावात ‘सर्वधर्मसमभाव’चा पोळा; मंदिरात प्रारंभ, समारोप दर्ग्यावर
तर, सर्वत्र असलेले धार्मिक कट्टरतेचे वातावरण आणि जातपातीच्या भिंती उंच होत असताना, बुलढाम्यातील मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे वर्षानुवर्षे सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्म समभावरूपी पोळा साजरा करण्यात येत आहे. काल (शुक्रवार) देखील यंदाचा पोळा पारंपरिक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कट्टरपंथीयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या पोळ्याची सुरुवात गावातील हनुमान मंदिरापासून होऊन समारोप रशिद मियाँच्या दर्ग्याजवळ झाला.