लोकसत्ता टीम

नागपूर: ‘देखो अपना देश’ उपक्रमांतर्गत रेल्वेने भारत गौरव पर्यटन गाडी चालवण्याचा निर्णय घेतला असून पहिली यात्रा दक्षिण भारताची असणार आहे. ही रेल्वेगाडी नागपूरमार्गे धावणार असल्याची माहिती आयआरसीटीसीचे महाव्यवस्थापक तनवीर हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Night special local for the convenience of employees voters Mumbai news
कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी रात्रकालीन विशेष लोकल धावणार
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?

इंडियन रेल्वे कॉरिंग ॲड टुरिजम कॉर्पोरेशनतर्फे ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. २५ मे रोजी बिलासपूर येथून ही १४ एलएचबी कोच असणारी विशेष रेल्वे रवाना होईल. विदर्भातील नागपूरसह गोंदिया, भंडारा रोड, सेवाग्राम, बल्लारशा स्थानकावर बोर्डिंगनंतर पुढील यात्रा सुरू होईल. यात्रेदरम्यान, रामेश्वरम, मदुराई, तिरुपती, श्रीशैलम् मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग आदी धार्मिक स्थळांसह दर्शनीय स्थळांना भेटी देता येणार आहे. ही संपूर्ण यात्रा ७ रात्र आणि ८ दिवसांची असणार आहे. यात्रेसाठी प्रतिव्यक्ती १५,५०० रुपये शुल्क आहे. आयआरसीटीसीच्या साईटवरून ऑनलाइन बुकिंग करता येईल. याशिवाय स्थानकावर प्रत्यक्ष बुकिंग करता येणार आहे. प्रत्यक्ष बुकिंग करणाऱ्यांना शुल्कात ५ टक्के अर्थात ७५० रुपयांची सवलत मिळणार आहे. या पत्रकार परिषदेला संयुक्त महाव्यवस्थापक क्रांती सावरकर, किशोर सत्या व अन्य अधिकारी उपस्थित होते.