नागपूर : जी २० शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या रात्रीभोजच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी भारताचे राष्ट्रपती असे लिहण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकार इंडियाऐवजी भारत असे नाव करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष अधिवेशनात हा बदल केला जाईल, असेही बोलले जात आहे. मात्र आतापर्यंत जगातील कोणत्या देशांनी त्यांच्या नावात बदल केला. त्याची कारणे काय होती, ते बघूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य-पूर्वेतील देश असलेल्या जॉर्डनवर ब्रिटिशांची सत्ता असताना त्याचं नाव ट्रांजॉर्डन असं ठेवण्यात आलं होतं. त्याला १९४६ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि १९४९ मध्ये देशाचं नाव पुन्हा एकदा बदलून किंग्डम ऑफ जॉर्डन असं ठेवण्यात आले. मार्च १९३५ पूर्वी इराणचं नाव फारस होतं. मात्र १९३५ मध्ये येथील सरकारने आपले राजनैतिक संबंध असलेल्या देशांनी आपल्याला इराण असे संबोधावे सांगितले. म्यानमारला आधी बर्मा म्हटलं जात होतं. लष्करी सरकारने १९८९ मध्ये देशाचं नाव म्यानमार केलं. इंग्रजांच्या काळात श्रीलंकेला सिलोन या नावाने ओळखलं जात असे. मात्र २० व्या शतकात स्वातंत्र्यलढा सुरू झाल्यावर देशाचं नामकरण श्रीलंका करण्याच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर १९७२ मध्ये देशाचं अधिकृतपणे द रिपब्लिक ऑफ श्रीलंका असं नामकरण करण्यात आलं. त्यानंतर १९७८ मध्ये डेमोक्रॅटिक सोशालिस्ट ऑफ श्रीलंका असं नामकरण करण्यात आले.

हेही वाचा – स्वच्छ हवेसाठी देशभरातून ८०० हून अधिक नागरिक एकवटले, उद्या आभासी मानवी साखळी…

तुर्की हा देश आता तुर्कीए म्हणून ओळखळा जातो. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दौगन यांनी हल्लीच देशाचं नामकरण तुर्कीए करण्याची घोषणा केली होती. सन २०२० मध्ये हॉलंडच्या सरकाने आपल्या देशाचं नाव बदलून द नेदरलँड करण्याचा निर्णय घेतला. या देशाचे दक्षिण हॉलंड आणि उत्तर हॉलंड असे दोन भाग आहेत. मार्च १८८५ मध्ये ब्रिटनने बोत्सवानाचं अधिकृत नाव बेचुयानालँड असे केले. मात्र ३० सप्टेंबर १९६६ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं नामकरण बोत्सवाना असे करण्यात आले.

हेही वाचा – मुंबईच्या नागपाडातून बालिकेचे अपहरण, कोलकाताकडे घेऊन जाणाऱ्या आरोपीला शेगावात अटक

इथिओपियाच्या उत्तर भागावर आधी अबीसीनिया साम्राज्याची सत्ता होती. मात्र दुसऱ्या महायुद्धादरम्यान राजा हेले सेलासीने देशाचं नाव बदलून ते अबीसीनियाऐवजी इथिओपिया असे केलं. सियाम या देशाचं नाव १९३९ मध्ये बदलून थायलंड असं करण्यात आलं. त्यावेळी येथे राजेशाही होती.
एप्रिल २०१६ पासून चेक प्रजासत्ताक चेकिया या नावाने ओळखले जाऊ लागले. या आधी या देशाला बोहेमिया या नावानेही ओळखले जात असे.