वाशीम : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ आज, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी विदर्भातील वाशीम जिल्ह्यात दाखल झाली. राहुल गांधी यांचे वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. वाशीम -हिंगोली सीमेवरील राजगाव येथे यात्रेचे स्वागत केल्यानंतर ही यात्रा वाशीमकडे मार्गस्थ झाली. काही वेळात बोराळा हिस्से येथे यात्रा पोहोचेल. येथे विश्रांती व भोजन घेतल्यानंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग असून उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jodo yatra entered vidarbha washim rahul gandhi congress tmb 01