बुलढाणा: भारत जोडो यात्रा आता जनआंदोलन झाले आहे. ही यात्रा आता कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेने देशात परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. असत्य बोलून सत्तेत आल्यावर जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सरकार जनताच खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा दावा काँगेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला.
सध्या बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान जलंब येथे प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश, त्यांच्या सहकारी महिमा सिंह, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. यावेळी पटोले म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही, पदयात्रा विशाल होईल व जनतेचे मोठे समर्थन मिळेल, असे सांगत होतो तेव्हा विरोधक आमची खिल्ली उडवत होते. पण देगलूरपासून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत मिळालेले जनसमर्थन राहुल गांधी व काँग्रेसवरचा विश्वास दृढ करणारे ठरले आहे. यामुळे भाजपने जनतेत निर्माण केलेली भिती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर मिळाले आहे. पदयात्रेमुळे निर्माण झालेले काँग्रेसमय वातावरण राज्यभर कायम ठेवू, असा निर्धार पटोले यांनी बोलून दाखविला.
हेही वाचा : पुस्तक वाचताना माणसे वाचायला शिका; अभिनेत्री मृणाल देव यांचे मत
…तरच विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबतील
यावेळी जयराम रमेश यांनी शेतकरी आत्महत्यांवर भाष्य करताना उपायही सांगितला. विदर्भात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली तरच आत्महत्यांना प्रतिबंध लागेल. सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला तरच हे शक्य असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. केंद्रातील सरकारला मोठा धडा शिकविणारा १९ नोव्हेंबर हा दिवस आहे. मागील वर्षी मोदी सरकारला याच दिवशी ३ काळे कृषी कायदे रद्द करावे लागले होते. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी एवढे मोठे आंदोलन केले. त्यात ७०० शेतकरी शहिद झाले. अखेर मोदी सरकारला झुकावे लागले व ते काळे कायदे रद्द करावे लागले. या निमित्ताने १९ नोव्हेंबर हा ‘शेतकरी विजय दिवस’ पाळला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.