शेगाव येथील जाहीर सभेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभलेल्या ‘भारत जोडो’ पदयात्रेचा जिल्ह्यातील मुक्काम वाढला आहे. ही यात्रा आता २३ वा २४ नोव्हेंबरला मध्यप्रदेशकडे कूच करणार असल्याची माहिती आहे. यात्रेला अनपेक्षित असा मोठा प्रतिसाद मिळाल्याने राहुल गांधींसह राष्ट्रीय काँगेसमध्ये उत्साह संचारला आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पट्ट्यातील यात्रेचा मुक्काम वाढला आहे. पक्ष सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, यात्रेचा मुक्काम २३ वा २४ तारखेपर्यंत वाढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्या, सोमवारी सकाळी खासदार राहुल गांधी हे गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते गुजरातमध्ये २३ वा २४ तारखेपर्यंत राहू शकतात. यामुळे यात्रेचे मध्यप्रदेशकडे होणारे प्रस्थान, त्यांच्या गुजरातमधून होणाऱ्या परतीवर अवलंबून आहे. यात्रा माघारी फिरणे नाहीच, असा राहुल यांचा निर्धार असल्याने, ही यात्रा जळगाव जामोद व मध्यप्रदेश सीमेवरील निमखेडी (जिल्हा बुलढाणा) येथे मुक्कामी राहणार आहे. यात्रेसोबतचे ‘कंटेनर’ निमखेडी येथेच राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गुजरात दौऱ्यासाठी निमखेडी येथेच ‘हेलिपॅड’ तयार करण्यात आले आहे.