नागपूर: भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची अखेर भारतीय जनता पक्षाने केली असून आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा आहे.सलग दोन वेळा प्रचंड मतदाधिक्याने गडकरी नागपूरमधून विजयी झाल्याने भाजपच्या हमखास विजयी होणाऱ्या जागेत नागपूरचा समावेश होता. त्यामुळे गडकरींचे नाव उमेदवाराच्या पहिल्या यादीत अपेक्षित होते. मात्र ते नसल्याने तर्कवितर्क लावले जात होते. शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर थेट गडकरींना मविआकडून निवडणूक लढण्याची ‘ऑफर’ दिली होती. त्याला फडणवीस यांच्याकडून प्रतिउत्तरही देण्यात आले होते. दुसऱ्या यादीत गडकरींचे नाव प्रथम क्रमांकावर असेल,असे त्यांनी  जाहीर केले होते. बुधवारी पक्षाने जाहीर केलेल्या  दुसऱ्या यादीत गडकरींच्या नावाचा समावेश असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतच्या सर्व तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला  आहे.

२०१४ मध्ये पहिल्यांदा गडकरी यांनी प्रथमच नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती व २ लाख ८४ हजार मतांनी काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांचा २ लाख १६ हजार मतांनी पराभव केला होता. आता २०२४ च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा त्यांना संधी  दिली आहे.  आता त्यांच्या विरोधात मविआचा  उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मविआमध्ये नागपूरची जागा काँग्रेसकडे आहे. या पक्षाकडून विद्यमान आमदार विकास ठाकरे व अभिजित वंजारी या दोन नावांची चर्चा आहे, ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे पक्षाला कळविले आहे. त्यामुळे पक्ष वंजारी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालते की नवा चेहरा निवडणुकीत उतरवते हे बघावे लागणार आहे.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

हेही वाचा >>>प्रतिभा धानोरकर यांच्या ‘त्या’ आरोपांनी खळबळ; काँग्रेसमधून विरोध

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर होताच नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पक्षाच्या धंतोलीमधील विभागीय कार्यालयापुढे फटाके फोडण्यात आले. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

गडकरींना मिळालेली मते

वर्ष          नितीन गडकरी      प्रतिस्पर्धी उमेदवार          मताधिक्य

२०१४       ५,८७७८७           ३,०२,२१९ ( कॉ)         २,८४,०००

२०१९       ६,६०२२१           ४,४४,२१२  ( कॉ)         २,१६. ०००

Story img Loader