नागपूर: भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची अखेर भारतीय जनता पक्षाने केली असून आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा आहे.सलग दोन वेळा प्रचंड मतदाधिक्याने गडकरी नागपूरमधून विजयी झाल्याने भाजपच्या हमखास विजयी होणाऱ्या जागेत नागपूरचा समावेश होता. त्यामुळे गडकरींचे नाव उमेदवाराच्या पहिल्या यादीत अपेक्षित होते. मात्र ते नसल्याने तर्कवितर्क लावले जात होते. शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर थेट गडकरींना मविआकडून निवडणूक लढण्याची ‘ऑफर’ दिली होती. त्याला फडणवीस यांच्याकडून प्रतिउत्तरही देण्यात आले होते. दुसऱ्या यादीत गडकरींचे नाव प्रथम क्रमांकावर असेल,असे त्यांनी जाहीर केले होते. बुधवारी पक्षाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत गडकरींच्या नावाचा समावेश असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतच्या सर्व तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा