अनिल कांबळे, लोकसत्ता

एकाच कार्यालयात नोकरी करीत असताना विवाहित सहकाऱ्याशी एका तरुणीचे सूत जुळले. तिने आईवडिलांच्या प्रेमाची आणि बदनामीची तमा न बाळगता प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने दुसऱ्या एका निष्पाप स्त्रीचा संसार मात्र अकारण धोक्यात आला. अखेर या प्रकरणात भरोसा सेलने मध्यस्थी केली व तरुणीचे समूपदेशन करीत दुसऱ्या स्त्रीचा मोडू पाहणारा संसार सावरला.

Wife Killed Husband For Property
Woman Killed Husband : आठ कोटींच्या मालमत्तेसाठी पत्नीने केली पतीची हत्या, मृतदेह जाळण्यासाठी ८४० किमीचा प्रवास आणि…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
woman in prison
स्त्री ‘वि’श्व : गजाआडच्या स्त्रियांचं जग
H( प्रातिनिधिक छायाचित्र )uman bomb threat on plane Threat in the name of a woman in Andheri Mumbai news
विमानात मानवी बॉम्बची धमकी; अंधेरीतील महिलेच्या नावाने धमकी
Sassoon Hospital exceeds capacity facing burden of forensic cases steps are being taken to reduce it
‘ससून’वरील ताण कमी होणार! अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वानवडी, हडपसर पोलिसांना आदेश
if Maratha society got cheated file case of fraud says Bipin Chaudhary
“मराठा समाजाला धोका दिल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करा” जरांगेंच्या आवाहनाला…
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल
CM Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…

हेही वाचा >>> नक्षलग्रस्त भागातील चिमुकल्या ‘प्रिन्स’चा शिक्षणासाठी संघर्ष, शाळेत पोचण्यासाठी रोज सहा किमी जंगलातून पायपीट

स्विटी (काल्पनिक नाव) ही एका खासगी कंपनीत नोकरीला लागली. तिचा कार्यालयातील विवाहित सहकाऱ्यावर जीव जडला. तो नेहमी तिला घरी सोडायला यायला लागला. त्यामुळे आईने स्विटीला विश्वासात घेऊन विचारणा केली. तिने प्रियकर असल्याची कबुली देऊन लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आईच्या जीवाची घालमेल झाली. मुलीची अनेकदा समजूत घातल्यानंतरही ती ऐकत नव्हती.

स्विटीच्या प्रेमात पडलेल्या तिच्या विवाहित प्रियकरानेही पत्नी व मुलांसह सुरू असलेल्या आनंददायी संसारावर पाणी सोडण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे स्विटीनेही कुुटुंबाच्या विरोधात बंड पुकारून विवाहित प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> अनिल देशमुखांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, प्रस्ताव कोणी कोणाला दिला ?

…अन् प्रेमाचे भूत उतरले भरोसा सेलमध्ये पोलीस निरीक्षक असलेल्या सीमा सूर्वे यांच्याकडे स्विटीच्या आईने तक्रार केली. सूर्वे यांनी स्विटी आणि तिच्या आईला कार्यालयात बोलावले. स्विटीला लग्न करण्याबाबत असलेल्या कायदेशीर अडचणींचा तिढा सांगितला. तसेच एका महिलेचा संसार तोडण्याच्या पातकाबाबतही अवगत केले. एक चिमुकला आपल्या वडिलांच्या प्रेमाला कसा मुकणार याची जाणीव करून दिली. त्यानंतर स्विटीच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरले. तिने लगेच प्रियकराशी चर्चा करून प्रेमसंबंध तोडले व नोकरी आणि शिक्षणावर भर देण्याची तयारी दर्शविली.