अनिल कांबळे, लोकसत्ता

पत्नीला दुर्धर आजार असल्याचे कळल्यानंतरही पतीचे एका विधवेवर प्रेम जडले. दोघांनी पत्नीच्या सहमतीने लग्न केले. तिघांचाही संसार सुरळीत सुरू होता. मात्र, पतीचे वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने त्यांचा संसार विस्कटला. अखेर भरोसा सेलने मध्यस्थी करून विस्कटलेला संसार नव्याने उभा केला. कोतवालीत राहणारे प्रमोद आणि प्रांजली (बदलेली नावे) यांचा दोन मुलांसह सुखी संसार सुरू होता. प्रमोद हा एका मोठ्या कंपनीत नोकरीला. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम. मात्र, प्राजंलीला एक दुर्धर आजार जडला. डॉक्टरांनीही हात वर केले. अशातच प्रमोदची अश्विनी (बदलेले नाव)शी ओळख झाली.

Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
actor amit tandon cheated wife ruby tandon
पत्नीची अनेकदा फसवणूक केली, अभिनेत्याचा स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खुलासा; घटस्फोट घेतल्यावर सहा वर्षांनी पुन्हा तिच्याशीच केलं लग्न
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला

हेही वाचा >>>v स्‍फोटाचा आवाज… भिंतींना हादरे… पण, गूढ काही उकलेना…

अश्विनी विधवा होती. ती एका कंपनीत नोकरी करीत मुलासह राहत होती. दोघांची मैत्री झाली. प्रमोदने वैवाहिक जीवनाबाबत तिला सांगितले. मानसिकरित्या खचलेल्या प्रमोदला अश्विनीने साथ देण्याचे ठरवले. दोघांनीही प्रांजलीची भेट घेतली व लग्न करण्यासाठी परवानगी मागितली. तिने स्वतःची प्रकृती आणि पतीची खचलेली मानसिकता लक्षात घेऊन लग्नास परवानगी दिली. दोघांनी लग्न केले. अश्विनी पहिल्या पतीच्या मुलासह प्रमोदच्या घरी राहायला आली. प्रमोदची पत्नी आणि अश्विनीमध्ये बहिणींसारखे संबंध निर्माण झाले. तिघांचाही संसार सुरळीत सुरू होता. अश्विनीला दिवस गेले आणि घरात पुन्हा एक नवीन पाहुणा आला. घरात आनंदमय वातावरण असतानाच काही दिवसांतच प्रमोदची पहिली पत्नी प्रांजली हिचा मृत्यू झाला. प्रमोद आणि अश्विनी यांनी प्रांजलीच्या मृत्यूच्या दुःखातून सावरून चार मुलांसह संसाररथ पुढे खेचणे सुरू ठेवले.

अनैतिक संबंधाचा संशय

प्रमोद आणि अश्विनी यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू असताना एका कौटुंबिक कार्यक्रमात प्रमोदच्या मोठ्या भावाची विधवा पत्नी स्विटीशी अश्विनीची ओळख झाली. स्विटीची तीन कापड दुकाने आहेत. तिचे घरी येणे-जाणे वाढले तशी स्विटीशी प्रकाशची जवळीकही वाढली. ती प्रमोद आणि अश्विनी यांना आर्थिक मदत करीत होती. दरम्यान, अश्विनीला स्विटीबाबत संशय आला. तिने प्रमोदला स्विटीपासून दूर राहण्यास सांगितले. त्यावरून दोघांत वाद झाले. अखेर अश्विनीने संबंध तोडण्यास सांगितले.

अन् संभ्रम दूर झाला…

पती-पत्नीचा वाद भरोसा सेलमध्ये गेला. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी दोघांचीही समजूत घातली. मात्र, स्विटीवरच्या आरोपांबाबत अश्विनी ठाम होती. सहायक निरीक्षक शुभांगी तकित यांनी स्विटीलाही भरोसा सेलमध्ये बोलावून घेतले. तिच्याशी दीराशी असलेल्या संबंधाबाबत चर्चा केली. त्यानंतर तिघांचेही समुपदेशन करण्यात आले. एकमेकांच्या मनातील संभ्रम दूर झाला. अश्विनीने पती आणि वहिनीची माफी मागितली. मात्र, दोघांनीही तिला बाहुपाशात घेऊन माफ केले.