विधानसभेत शिवसेना आमदार ( ठाकरे गट ) भास्कर जाधव यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत एक प्रश्न उपस्थित केला. यावर आक्षेप घेत भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्ष्य केलं. सभागृहासमोर तो विषय नसताना कोणीही बोलायचं. यामुळे तुमच्या कारकिर्दीला डाग लागणार आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

आमदार भातखळकर यांनी विधानसभेत एमआयडीसीमधील ४ लाख १४ हजार स्वेअर मीटर जागा बेकायदेशीरपणे रहिवासी वापरासाठी परावर्तीत केल्याचा आरोप केला. “३ हजार १०९ कोटी रुपये अशी जागेची बाजारभाव किंमत या जागेची आहे. कोण आहेत, भूषण सुभाष देसाई? भूषण देसाई यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच, तत्कालीन उद्योगमंत्र्यांची चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली.

हेही वाचा : “वेगळ्या विदर्भासाठी फडणवीसांची भीष्म प्रतिज्ञा, मग…”, अर्धवेळ उपमुख्यमंत्री म्हणत एकनाथ खडसेंचा सवाल

यानंतर भास्कर जाधव यांनी यावर आक्षेप घेतला. भास्कर जाधव म्हणाले, “आपण सांगता, नियमाने हे सभागृह चालवणार. मात्र, सभागृहात असे सदस्य कोण वक्तव्य करत असेल, तर त्याला मत मांडण्याची संधी दिली जाती. पण, हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याला आपण संधी देत नाही.”

“संसदेत एकाने मागणी केली, एसआयटी चौकशी..”

“परंतु, अतुल भातखळकर यांना कोणत्या नियमाने बोलण्यास दिलं. सभागृहासमोर तो विषय नाही, अथवा त्याची चर्चा नाही. अशा वेळेला कधीही कोणीही उठायचं. परवा, संसदेत एकाने मागणी केली, एसआयटी चौकशी लावली. इथे एकजण उठले एसआयटी चौकशी लावण्यात आली. काय चाललं आहे, काय. यामुळे तुमच्या कारकिर्दीला डाग लागणार आहे. आपण संख्याबळाच्या बळावर तोंड बंद करु शकता,” असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav on assembly chief rahul narvekar over atul bhatkhalkar ssa