नागपूर : १९८८ मध्ये जिथे अनेक बाबतीत हिंदू धर्म उदासीन झाला होता त्यावेळी गोरक्षण हा जनतेचा विषय व्हावा म्हणून त्यावेळी काहींनी उभे राहत गोरक्षण सभेची स्थापना केली. पण आज भारतात गो सेवा आणि गोरक्षण समजून सांगण्याची वेळ आली आहे आणि हेच आपल्यासाठी वेदनादायी असल्याचे भाष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.

गोरक्षण सभेच्या नवीन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळाच्यावेळी भय्याजी जोशी बोलत होते. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांचे गोसेवा आणि गो रक्षण क्षेत्रातील योगदान हे इतिहासात नोंद करणारे आहे. त्यांनी त्यावेळी हा विषय जनतेचा व्हावा यासाठी प्रयत्न केले, असे जोशी म्हणाले.

हेही वाचा – बाप्पाच्या अतिप्रिय मोदकाला महागाईची झळ, दरात प्रतिकिलो ५ ते १० टक्क्यांची वाढ

हेही वाचा – Talathi Exam Result : तलाठी भरती परीक्षा संपली, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या…

मानवाने स्वतःच्या लालसेपोटी जी चूक केली. जमिनीतील अतोनात काढून नष्ट केले. प्रकृतीवर अत्याचार केला यातून वाचवणारा एकमेव प्राणी म्हणजे गाय आहे. आज जर आपल्याला जगायचे असेल तर गोमातेचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे गोरक्षा करण्यासाठी सरकार जरी कायदे करत असली तरी त्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे भैयाजी जोशी म्हणाले. जमिनीचे पोषण हे कुठल्याही प्रकारच्या रसायनाने होणार नाही हे विज्ञानेसुद्धा मान्य केले आहे, असेही भय्याजी जोशी यांनी सांगितले.

Story img Loader