नागपूर : उत्तर प्रदेशातील भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी बुधवारी नागपुरात कॉंग्रेस नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली.नागपूरमधील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला आझाद नागपूरमध्ये आले होते.
दीक्षाभूमी येथे त्यांनी ‘संकल्प’ या स्वयंसेवी संघटनेच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. संकल्प मार्फत राबविण्यात आलेल्या भोजनदान आणि संकल्पच्या इतर उपक्रमाची माहिती डॉ. राऊत यांनी चंद्रशेखर यांना दिली.माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात संकल्प या संस्थे मार्फत अविरत तीन दिवस दीक्षाभूमी येथे निशुल्क भोजन वितरीत केले जाते. धम्मचक्र प्रवर्तन दिनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी संकल्पच्या स्टॉलला भेट दिली होती.