नागपूर : भीम आमींचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी बुधवारी नागपूर भेटीत दीक्षाभूमीला भेट दिली. कार्यकर्त्यांची बैठक घेतली, तसेच निवडणूकीबाबत चर्चाही केली. देशातील पाच राज्यात निवडणूका आहेत. यातील मिझोराम वगळता इतर चारही राज्यात भीम आमीं निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. गोरेवाडा येथे कार्यकर्त्यांशी चर्चाही केली. यावेळी त्यांनी निवडणूकीत पक्षाच्या बळकटीसाठी आघाडी करण्याची तयारीही दर्शविली. इतर पक्ष यासाठी पुढे येत असेल तर त्याचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद,कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांची भेट
भाजपवर टीका
आझाद यांनी यावेळी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजप निवडणूकीसाठी धर्माचा आधार घेते. ते अयोग्य आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जनतेच्या प्रश्नाचे समाधान आवश्यक आहे. त्यासाठी भाजप काहीही करीत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.