लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमरावती : आश्रमात वास्‍तव्‍यास असलेल्‍या महिलेवर बलात्‍कार केल्‍याचा आरोप असलेल्‍या तिवसा तालुक्यातील मार्डी येथील भोंदू गुरूदासबाबाला जेरबंद करण्‍यात ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले असून त्‍याला मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका लॉजच्‍या बाहेर अटक करण्यात आली.

कुऱ्हा पोलिसांनी २५ जानेवारीला रात्री मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून मार्डी येथील सुनील कावलकर ऊर्फ गुरुदासबाबा (वय ४७) या भोंदूविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याचदिवशी अन्य एका महिलेच्या तक्रारीवरून त्याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. त्‍यानंतर गुरूदासबाबा हा पसार झाला होता.

आणखी वाचा-“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझा ‘गेम’ करण्याचा आदेश दिला होता” आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक आरोप

त्याचा शोध घेताना पोलीस पथके यवतमाळातील वणी, नागपूर, वर्धा येथील त्याचे आश्रमवजा घर तसचे मध्य प्रदेशातील काही ठिकाणी जाऊन आली. मात्र तो मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने गुरूदासबाबाच्या एका भक्ताच्या हालचालीवर लक्ष ठेवत मागोवा घेतला. ८ फेब्रवारी रोजी गुरूदासबाबा हा दिल्लीहून भोपाळला येत असल्याची माहिती त्याच भक्ताच्या माध्यमातून स्‍थानिक गुन्‍हे शाखेला मिळाली. त्याआधारे पथकाने गुरूवारी रात्री भोपाळ रेल्वेस्टेशनलगतच्या एका लॉजबाहेरून ताब्यात घेतले. ओळख पटविल्यानंतर एलसीबीचे पथक त्याला घेऊन शुक्रवारी अमरावतीत पोहोचले. येथे आणल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसेच चांदूर रेल्वेच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण वानखडे यांनी त्‍याची चौकशी केली.

आणखी वाचा-“घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी”, वडेट्टीवार म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी…”

त्याला शुक्रवारी दुपारी तिवसा न्यायालयात हजर करण्यात आले. गरम तव्यावर बसून भक्तांना अश्लिल शिविगाळ करणाऱ्या भोंदू गुरूदासबाबाची चित्रफित गेल्‍या वर्षी मार्चमध्‍ये समाज माध्‍यमांवर प्रसारीत झाल्‍यानंतर हा बाबा चांगलाच चर्चेत आला होता.