लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमरावती : आपल्या कौटुंबिक समस्यांचे निवारण करण्यासाठी आलेल्या एका भक्त महिलेचे भोंदूबाबाने लैंगिक शोषण केले. या प्रकाराची मोबाइलमध्ये चित्रफीतसुद्धा बनविली. ही घटना कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी हा बाबा गरम तव्यावर बसून भक्तांच्या समस्या सोडवित असल्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत झाली होती.

गुरुदासबाबा उर्फ सुनील जानराव कावलकर (४७) रा. मार्डी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. मध्यप्रदेशातील रहिवासी पीडित ३४ वर्षीय महिला ही आपल्या कौटुंबिक समस्यांचे निवारण करण्यासाठी गुरुदासबाबा याच्या आश्रमात आली होती. त्यावर पुढील सहा ते सात महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल, त्यानंतर समस्या सुटणार, असे गुरुदासबाबाने त्या महिलेला सांगितले. आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी त्या महिलेनेसुद्धा आश्रमात राहण्याची तयारी दर्शविली.

आणखी वाचा-‘भारतरत्न’ कर्पुरी ठाकूर यांच्या ‘त्या’ नागपूर दौऱ्यात काय घडले होते?

दरम्यान, या काळात गुरुदासबाबाने याने त्यांना अंगारासारखा पदार्थ दिला. सदर पदार्थ खाल्यावर पीडित महिलेला गुंगी आली. नंतर गुरुदासबाबाने त्यांचे लैंगिक शोषण केले. एक दिवस गुरुदासबाबाचा मोबाइल महिलेच्या हाती लागला. त्यावेळी त्याने शारीरिक संबंधाच्या वेळी बनविलेली चित्रफीत त्यांना दिसून आली. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच पीडित महिलेने गुरुदासबाबाला जाब विचारला. त्यावर त्याने महिलेलाच धमकाविले. त्यामुळे महिलेने कुऱ्हा पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुरुदासबाबा विरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुरुदासबाबा फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

आणखी वाचा-पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल रखडला; उमेदवार संभ्रमात, ‘एमपीएससी’कडे लक्ष

गरम तव्यामुळे चर्चेत आला होता बाबा

काही महिन्यांपूर्वी याच भोंदूबाबाची गरम तव्यावर बसून नागरिकांच्या समस्या सोडवित असल्याची चित्रफित प्रसारीत झाली होती. त्‍यावर चांगलीच चर्चा रंगली होती. त्याबाबत चौकशी होताच हा बाबा चारधाम यात्रेसाठी जात असल्‍याचे सांगून पसार झाला होता. दरम्यान, महिलेवरील अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर तो पुन्हा पसार झाला आहे.