नागपूर : पेट्रोल-डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत झालेल्या दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पक्षातर्फे ‘भोंगा मोर्चा’ काढण्यात आला. पाच राज्याच्या निवडणुका आटोपल्यावर पेट्रोल, डिझेल व सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सामान्य लोकांना त्याचा मोठा फटका बसतो आहे. वाढलेल्या किंमतीमधील मोठा भाग हा केंद्र व राज्य सरकारच्या करांचा आहे. डिझेलवर जवळपास ९० टक्के व पेट्रोलवर जवळपास ११० टक्के सरकारी कर लादले आहेत. जेव्हा इंधन दरवाढ होते तेव्हा दळणवळण महागते आणि त्यामुळे बाजारातील सर्वच वस्तूंचे दर वाढतात. केंद्र व राज्य सरकारने इंधनावरील त्यांच्या करात कपात करून महागाई आटोक्यात आणावी, या मागणीासाठी आम आदमी पक्षाने मोर्चा काढला. यावेळी अमृत सावरकर, अशोक मिश्रा, कविता सिंगल, शंकर इंगोले, भूषण ढाकुलकर, डॉ. शहीदअली जाफरी आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा