लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गडचिरोली : तब्बल ३९ गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या नक्षलवादी दाम्पत्याला अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले आहे. कुसनन अशोक रेड्डी उर्फ बलदेव आणि कुमारी कोटाई उर्फ रहमती, असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे असून मध्यप्रदेशातील जबलपूर येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघांवरही २० लाखांचे बक्षीस होते. यापूर्वी २००५ मध्ये गडचिरोली येथील पुराडा परिसरात केलेल्या हिंसक गुन्ह्यात देखील कुसनन अशोक रेड्डी याला अटक झाली होती.
तेलंगणातील उस्मानिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला कुसनन अशोक रेड्डी सुरुवातीच्या काळात एका कंपनीत कार्यरत होता. तिथे तो कामगार चळवळीशी जुळला. १९८९ ला नक्षल चळवळीशी संपर्क आल्यानंतर ‘पीपल्स वॉर’मध्ये तो सक्रिय झाला. १९९२ मध्ये अम्प्रो बिस्कीट कंपनीच्या व्यवस्थापकाच्या हत्येप्रकरणी त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. १९९५ ला जामिनावर सुटल्यानंतर तो दंडकारण्यात गोंदिया येथे पुन्हा सक्रिय झाला. २००१ मध्ये लग्नानंतर त्याने गडचिरोली येथे कुरखेडा पुराडा परिसरात विविध हिंसक कारवाया घडवून आणल्या. २००६ साली त्याची नक्षल्यांच्या महाराष्ट्र समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
आणखी वाचा-रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! दिल्ली-नागपूरसाठी दुरांतो एक्सप्रेस लवकरच
दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली. २०१२ मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली. काही काळ गावात राहिल्यानंतर २०१४ पासून तो भूमिगत होता. यादरम्यान अशोक दंडकारण्य स्पेशल झोनल समितीत सदस्य म्हणून कार्यरत होता, तर त्याची पत्नी रहमती उत्तर बस्तर समितीची सदस्य आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगणातील हनमकोंडा येथून दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य मुला देवेंदर रेड्डी याला नक्षल समर्थक तिरुपतीसह अटक करण्यात आली आहे. अशोक रेड्डीच्या अटकेने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.