नागपूर : सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असतांनाच गुरूवारच्यात तुलनेत शुक्रवारी २४ तासात दरात मोठी घट नोंदवली गेली. त्यामुळे लग्नानिमित्त सोन्याचे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने दरवाढीमुळे ग्राहक चिंतेत होते, हे विशेष.
सोने- चांदीचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. परंतु त्यानंतर पून्हा दर वाढ झाली. नागपुरात धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये होते. लक्ष्मीपूजनाला (१ नोव्हेंबर) हे दर प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले होते. परंतु त्यानंतर दरात घट झाली.
हेही वाचा…अमरावती : रेल्वे प्रवाशांसाठी खुषखबर ! सामान्य डब्यांच्या संख्येत वाढ
नागपुरात १२ डिसेंबरला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार रुपये होते. या दरात २४ तासानंतर दुसऱ्याच दिवशी बाजार उघडल्यावर घड झाली. हे दर शुक्रवारी दुपारी (१३ डिसेंबर) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७७ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे १२ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर निघालेल्या सोन्याच्या दराच्या तुलनेत १३ डिसेंबरला दुपारी नागपूरात सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये ८०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ७०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ६०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ५०० रुपये प्रति दहा ग्राम कमी नोंदवले गेले. दरात घसरण झाल्याने ग्राहकांना लग्नानिमित्त सोन्याचे दागिने खरेदीनिमित्त दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा…बुलढाणा: ‘आधार’च्या मदतीने तेलंगणामधील नातेवाईकांचा शोध
चांदीच्या दरामध्ये घसरण…
नागपुरातील सराफा बाजारात १२ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता चांदीचे दर ९४ हजार ९०० रुपये प्रति किलो होते. हे दर १३ डिसेंबरला दुपारी ९० हजार ५०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे १२ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर निघालेल्या सोन्याच्या दराच्या तुलनेत १३ डिसेंबरला नागपूरात चांदीचे दर तब्बल ४ हजार ४०० रुपये प्रति किलोने घसरले.