लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर: नागपूरसह देशातील नागरिक सोने- चांदीसारख्या मौल्यवान गोष्टींचे चाहते आहे. सण, उत्सव, समारंभ, लग्न समारंभात या दागिन्यांची जोरात खरेदी होते. उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने- चांदीचा विचार होतो. नागपुरातील सराफा बाजारात गेल्या पाच दिवसांत सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
नागपूर सराफा बाजारातील दरानुसार १९ जून २०२३ रोजी नागपूरात २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रामसाठी ५९ हजार ८०० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर ५६ हजार ८०० रुपये, १८ कॅरेट सोन्याचा दर ४७ हजार ८०० रुपये होता. पाच दिवसांनी २४ जून २०२३ रोजी सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे नागपुरात २४ कॅरेज सोन्याचे दर १ हजार रुपयांनी घसरून ५८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचा दर ९०० रुपयांनी घसरून ५५ हजार ९०० रुपये, १८ कॅरेट सोन्याचा दर ८०० रुपयांनी घसरून ४७ हजार रुपये नोंदवला गेला.
आणखी वाचा-वर्धा: अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
तर चांदीचा दर १९ जून रोजी ७३ हजार ६०० रुपये किलो होता. हा दर तब्बल ४ हजार ३०० रुपयानी घसरून २४ जूनला ६९ हजार ३०० रुपये नोंदवला गेल्याची माहिती रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी दिली. या दराव्यतिरिक्त दागिन्यांवर मजुरीसह विविध कर अतिरिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.