नागपूर: नागपूरसह देशभऱ्यात मध्यंतरी सोन्याच्या दर घसरले होते. त्यानंतर दर स्थिरावून १९ जुलैला प्रथमच दर ६० हजारावर गेले होते. आता पुन्हा हे दर कमी होऊन २४ जुलैला नागपुरातील सराफ बाजारात प्रति दहा ग्राम ५९ हजार ७०० रुपये दर नोंदवले गेले.

नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २४ जुलै २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ८०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७५ हजार १०० रुपये होते. हे सोन्याचे दर १९ जुलै २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार १०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार १०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार १०० रुपये होते.

हेही वाचा… नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या क्षतिग्रस्त पुलाच्या महाआरतीला परवानगी नाकारली; नेमके झाले तरी काय, वाचा…

तर चांदीचे दर प्रति किलो ७६ हजार ४०० रुपये होते. त्यामुळे नागपूरकरांना सोन्या- चांदीचे दागीने खरेदी करण्याची मोठी संधी असल्याचे रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.

Story img Loader