नागपूर: देशभरात सातत्याने सोने- चांदीच्या दरात चढ- उतार बघायला मिळत असून दर स्थिर होण्याचे नाव घेत नाही. सोमवारी (२२ जुलै) नागपुरातील सराफा बाजारात गेल्या पाच दिवसांमध्ये सोने- चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने- चांदीचे दागीने खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी (२२ जुलै) दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७३ हजार ३०० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. हे दर १८ जुलैला ७४ हजार ३०० रुपयापर्यंत वाढले होते. तर १३ जुलैला ७३ हजार १०० रुपये होते. त्यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत असतांनाच पाच दिवसांमध्ये नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम चक्क १ हजार रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे ग्राहकांना दागीने खरेदीची चांगली संधी असल्याचे सराफा व्यवसायिकांचे म्हणने आहे.

हेही वाचा >>>शाळांना सुटी अन्ं पावसाने मारली दांडी; हवामान खात्याचा अंदाज पुन्हा…

नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसेसह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट दिली जातात. त्यामुळे आताही सराफा बाजारात कमी- अधिक प्रमाणात ग्राहकांची रेल- चेल दिसत आहे. नागपुरात २२ जुलैला दुपारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपये होते. हे दर १८ जुलैला दुपारी २४ कॅरेटसाठी ७४ हजार ३०० रूपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार १०० रूपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ३०० रुपये होते. त्यामुळे २२ जुलैच्या तुलनेत १८ जुलैच्या सोन्याच्या दराची तुलना केल्यास नागपुरात २४ कॅरेटसाठी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम १ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ७०० रुपयांनी खाली घसरलेले दिसत आहे. दरम्यान लवकरच सोन्याचे दर पून्हा वाढण्याचे संकेत असल्याने ग्राहकांना ही दागीने खरेदीची चांगली संधी असल्याचा दावा नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून केला जात आहे.

चांदीच्या दरातही चक्क ३ हजारांची घट

नागपूर सराफा बाजारात १८ जुलैला दुुपारी चांदीचे दर प्रति किलो ९२ हजार १०० रुपये नोंदवण्यात आले होते. हे दर २२ जुलैला दुपारी ८९ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात मागील पाच दिवसांमध्ये प्रति किलो चक्क ३ हजार रुपयांची घट झालेली दिसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big fall in gold price in five days nagpur mnb 82 amy