लोकसत्ता टीम
नागपूर: गणेशोत्सवानंतर सातत्याने नागपूर जिल्ह्यात सोन्याचे दर खाली घसरतांना दिसत आहे. ७ ऑक्टोंबरच्या सकाळी १०.३१ वाजता नागपुरात सोन्याच्या दरात मोठी घसरून होऊन दर प्रति दहा ग्राम ५७ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. हा गेल्या काही महिन्यातील सोन्याच्या दरातील निच्चांक आहे.
आणखी वाचा-प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; गोंदियात लवकरच सभा, सभेनंतरच कळणार…
नागपूर सराफा बाजारातील दरानुसार ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी येथे प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५७ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५४ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४५ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३७ हजार २०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ६९ हजार १०० रुपये होते. हे सोन्याचे दर १ ऑक्टोंबर २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५७ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५४ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३७ हजार ६०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७० हजार ४०० रुपये होते. हे सोन्याचे दर १९ जुलै २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार १०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार १०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार १०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७६ हजार ४०० रुपये होते. या वृत्ताला नागपुरातील रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी दुजोरा दिला.