नागपूर: लग्नाचा हंगाम सुरू झाल्यावर सोन्याचे दर ३० डिसेंबर २०२३ रोजी ६३ हजार ६०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत वाढले होते. परंतु आता ९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी मोठी घसरण झाली आहे. नागपुरात मंगळवारी दुपारी सोन्याचे दर ६३ हजारांहून खाली म्हणजेच प्रति दहा ग्राम ६२ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे लग्न असलेल्या कुटुंबियांसह सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरसह राज्याच्या इतरही भागांत लग्नाचा हंगाम सुरू आहे. मोठ्या संख्येने लग्नासह स्वागत समारंभ आणि इतरही कार्यक्रमांची रेलचेल आहे. मोठ्या प्रमाणात सोने- चांदिच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. परंतु या हंगामात दर वाढल्याने लग्न असलेल्या घरात सोने खरेदीने चिंता वाढली होती. नागपूर सराफा बाजारातील दरानुसार ९ जानेवारी २०२४ रोजी नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ६०० रुपये होता.

हेही वाचा – गेल्या दोन वर्षांत ३५२ पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी, ३३ पक्ष्यांचा मृत्यू

हे दर ४ जानेवारी २०२४ रोजी नागपुरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६३ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता. तर ३० डिसेंबर २०२३ रोजी हे दर २४ कॅरेटसाठी ६३ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटचा दर ६० हजार ४०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ९०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७४ हजार ३०० रुपये होता. रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी हे दर आणखी वाढण्याचे संकेत दिले आहे.

हेही वाचा – नागपूरकरांनो महालकडे जायचे आहे? घराबाहेर पडताना ‘हे’ रस्ते टाळा

६५ हजार रुपयांपर्यंत दरवाढीचा अंदाज

नागपुरात डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मधील आजपर्यंत सतत सोन्याच्या दरात ६३ हजार ते ६३ हजार ७०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत
दर होते. परंतु आंतराष्ट्रीय बाजारपेठेत आणि देशातील वाढती मागणी बघता हे दर येत्या काही महिन्यांत ६५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाण्याचा अंदाज नागपुरातील सराफा व्यवसायिक वर्तवत आहे.