नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून शुल्कात ७ टक्के वाढ केली आहे. विद्यापीठाने सोमवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. हे सुधारित शुल्क फक्त सत्र २०२४-२५ मध्ये पहिल्या सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लागू राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठाच्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून दरवर्षी ७ टक्के शुल्क वाढ लागू करण्याबाबत विद्यापीठाने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी अधिसूचना जारी केली होती. यामुळे २२ मे २०२४ रोजी झालेल्या विद्वत परिषद आणि २७ जून २०२४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय कायम ठेवत ७ टक्के शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१६ पासून विद्यापीठाने प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ केलेली नव्हती. शुल्कवाढ करण्याची मागणी महाविद्यालय संस्थाचालकांकडून सातत्याने होत होती. त्यामुळे २०२३ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये शुल्कवाढीवरील बंदी उठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि ही बंदी हटवण्यात आली. त्यानुसार आता नवीन शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७ टक्के शुल्क वाढ लागू होणार आहे.

हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस म्हणते…

अनेक महाविद्यालये ही विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क आकारतात. त्यामुळे अशा महाविद्यालयांना विद्यापीठाने विविध सूचना दिल्या आहेत. या अधिसूचनेत नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना शुल्क वाढीनुसार विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिल्या सत्रासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून जुने शुल्क घेतले असेल, तर या विद्यार्थ्यांकडून नव्या अधिसूचनेनुसार शुल्क आकारण्यात यावे असेही कळवण्यात आले आहे.

विद्यापीठाचे शुल्क वाढल्याने विद्यार्थ्यांना यंदा मोठा फटका बसणार आहे. यापूर्वीही शिक्षण शुल्कामध्ये वाढ होण्यावरून आंदोलन करण्यात आले होते. विद्यार्थी संघटनांनी याला विरोध केला होता. मात्र, सर्वांशी चर्चा करून विद्यापीठाने अखेर शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – अंबानींची लग्नपत्रिका असेल वेगळी, पण चर्चा मात्र ‘या’ लग्नपत्रिकेचीच

विनाअनुदानित महाविद्यालयांचे शुल्क

क्रीडा निधी- ३४ रुपये.

अश्वमेध – ३६ रुपये.

वैद्यकीय- ८५ रुपये.

विद्यार्थी मदत – १३२ रुपये.

विमा निधी- ४० रुपये.

ओळखपत्र -२७ रुपये.

विनाअनुदानित महाविद्यालयातील अभ्यासक्रम शुल्क

बीए. बी.कॉम., बीबीए. – १४३६ रुपये.

एम.ए., एम.एस.डब्ल्यू., एम.ए. मास कम्युनिकेशन – १५४६ रुपये.

बी.एस्सी – १६८३ रुपये

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big hike in nagpur university tuition fees see how much fee you have to pay for any course from this year dag 87 ssb
Show comments