नागपूर : पेशंट राईट फोरमकडून सातत्याने रुग्णांसाठी मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील एमआरआय यंत्र वाढीसह इतरही अनेक मागण्या करण्यात आल्याा आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असून राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावर मात्र लक्षावधींचा खर्च केला जात आहे. या रुग्णांच्या मागणीसाठी पेशंट राईट फोरम २७ नोव्हेंबरला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेशंट फोरमने सांगितले की, मेडिकल, मेयो रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना एमआरआय, सीटी स्कॅनसाठी एक महिना वा जास्त प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे मेडिकलला दोन एमआरआर व एक सीटी स्कॅन वाढवण्याची मागणी केली. परंतु, काहीही झाले नाही. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातील बहुतांश शौचालय बंद असून ते सुरू होत नाही. रुग्णांच्या जेवणाचा दर्जा सुधारणे, सुपरमध्ये एमआरआय व रक्त विघटन प्रकल्प, रक्त पेढीतील एसडीपी यंत्र बंद असणे, कॅन्सर विभागातील कालबाह्य कोबाल्ट बंद करून लिनिअर एक्सिलेटर लावणे, मेडिकल- मेयो रुग्णालयातून गरीब रुग्णांचा पार्थिव घरी पाठवण्यासाठी नि:शुल्क वाहन उपलब्ध करणे, सिकलसेल- थॅलेसेमियाग्रस्तांच्या उपचारासाठी स्वतंत्र डे- केअर विभाग, बाल कर्करुग्णांसाठी हेमेटोलाॅजिस्ट नियुक्त करणे, त्वचापेढी सुरू करण्यासह इतरही अनेक मागणी आहे.

हेही वाचा – नऊ नवीन आरटीओ कार्यालयांच्या जबाबदारींचे वाटप, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावर लक्षावधी रुपये खर्च करण्यावर आक्षेप नाही. परंतु, गोरगरीब रुग्णांसाठी तातडीने निधी मिळावा म्हणून हे आंदोलन असल्याचेही पेशंट राईट फोरमने प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे.

हेही वाचा – व्याघ्र प्रकल्पांतील गुन्ह्यांच्या शोधासाठी श्वानपथक; हरियाणातील पंचकुला येथे प्रशिक्षण सुरू

पेशंट राईट फोरमचे म्हणणे..

मेडिकलला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने येथे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येथे रंगरंगोटी, बगिचे, स्काय वाॅक, रस्ते दुरुस्ती, सौंदर्यीकरणसह इतर कामांवर लक्षावधींचा खर्च केला जात आहे. परंतु, येथे शासनाने निधी देऊन रुग्णांसाठी विविध रखडलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासह वैद्यकीय चाचणी, सगळ्याच औषधांसह इतरही सोय करणे आवश्यक आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big money spent on president program patients demands ignored patient right forum will go on hunger strike mnb 82 ssb