लोकसत्ता टीम

नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून आलेल्या दबावामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अखेर २५ ऑगस्टची राज्यसेवा पूर्व परीक्षा चौथ्यांदा रद्द केली होती. राज्यसेवा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या २ लाख २५ हजार उमेदवारांमध्ये जवळपास ५ हजारांवर उमेदवार हे ‘आयबीपीएस’ची परीक्षा देणारे असतात तर कृषी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचे दोन दिवसांआधीच आयोगाने जाहीर केले होते. असे असतानाही काही हजारांसाठी लाखो उमेदवारांना वेठीस धरल्याने संताप व्यक्त केला जात होता. आता नेमकी ही परीक्षा कधी होणार, हा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला असून यासंदर्भात महत्त्वाची माहिती एमपीएससीमधील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यादिशेने परीक्षेचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

एमपीएससीने परीक्षा पुढे का ढकलली?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थींनी पुणे येथे ठिय्या आंदोलन केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना या बाबत सकरात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानंतर आता २२ ऑगस्टला सकाळी दहा वाजता एमपीएससीची बैठक झाली. यात परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

आणखी वाचा-चंद्रपूर : ब्रम्हपुरीतील तिघांची पोलीस उपनिरीक्षकपदी वर्णी, हलाखीच्या परिस्थितीवर मात

कृषी सेवा परीक्षा स्वतंत्र होणार

कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश राज्यसेवा परीक्षेत करण्याची परीक्षार्थींची मागणी आहे. मात्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने २५ ऑगस्टच्या परीक्षेत या पदांचा समावेश करणे शक्य नाही, असे पत्रक आयोगाने २० ऑगस्टलाच जाहीर केले होते. परीक्षा पुढे ढकलल्याने आयोगाकडे मागणीपत्र आल्यावर राज्यसेवा परीक्षेमध्ये कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश केला जाईल अशी शक्यता होती. मात्र, त्यांचे मागणीपत्र परत सरकारकडे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पदांचा यामध्ये समावेश होणे अशक्य आहे.

यानंतर आयोग परीक्षेची तारीख जाहीर करणार

एमपीएससीची राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे. सर्व प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहचल्या असून त्यांना कधीही परीक्षा घेणे शक्य आहे. मात्र, असे असले तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकांचा फटका परीक्षेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आता राज्यसेवा परीक्षा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी निवडणुकांच्या तारखांचा अंदाज घेऊनच आयोग परीक्षेची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.