यवतमाळ : एटीएमकार्डची अदलाबदल करीत फसवणूक केल्याप्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली. स्थानिक अवधुतवाडी पोलिसांनी ही कारवाई करून टोळीकडून जवळपास एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

बिकी कुमार विनय कुमार (२५), अभिषेक कुमार सुभाष सिंग (२४), मुरारी कुमार विजय पांडे (२८) आणि गुलशन कुमार टुनटुनसिंग (२३) सर्व रा. गया (बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने राज्यभरात अनेक गुन्हे केले असून, ते उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले

हेही वाचा – नागपूर : स्पेनच्या तुलनेत भारतात अत्यल्प अवयवदान – प्रा. डॉ. टॉम चेरियन यांची माहिती

यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावरील एसबीआयच्या एटीएमवर ७ जूनला सायंकाळी उदय डाखोरे हे पैसे काढण्यासाठी गेले होते. अशात एटीएमवर एका व्यक्तीने हातचलाखी करून त्यांचे महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड अदलाबदल केले. त्यानंतर त्यांच्या एटीएमकार्डचा चुकीचा वापर करीत परस्पर ४५ हजार रुपयांची रक्कम काढून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून तपास सुरू केला.

हा गुन्हा बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील आंतरराज्यीय टोळीने केल्याची बाब ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंह बिलवाल यांना तपासात निदर्शनास आले. पोलिसांनी या टोळीच्या लोकेशनवरून प्रथम बिहार गाठले. त्यानंतर ही टोळी मध्यप्रदेशात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मध्यप्रदेशातील शिवपुरी येथून शिताफीने या टोळीस जेरबंद केले.

अवधुतवाडी पोलीस ठाण्यात एटीएम अदलाबदली करून फसवणुकीचा गुन्हा नोंद होता. यातील टोळी बिहार राज्यातील असल्याचे समोर आले. या टोळीजवळ झारखंड राज्यातील कार होती आणि टोळीला मध्यप्रदेशातून अटक करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. या टोळीने यवतमाळात गुन्हे केल्याची कबूली दिल्याने त्यांना यवतमाळमधील अवधुतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या चौघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, अवधुतवाडी ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंह बिलवाल यांच्यासह पथकाने केली.

हेही वाचा – वाघ व हत्तींचा धुमाकुळ; नागरिकांमध्ये भीती; गडचिरोली जिल्ह्यातून हत्ती चंद्रपूर जिल्ह्यात दाखल

अशी करायचे फसवणूक

ही आंतरराज्यीय टोळी एटीएमला फेवीक्विक लावत होती. त्यानंतर ग्राहकाने कार्ड मशिनमध्ये टाकले की ते अडकत होते. ग्राहक मदतीसाठी बाहेर निघाला की हीच टोळी ते कार्ड कटरच्या मदतीने काढून स्वत:जवळील कार्ड स्वाईप मशिनमध्ये स्वाईप करून त्यातील रक्कम काढत होते. त्यांच्याकडे मास्टर चावीसुद्धा सापडली आहे.

खबरे कामी आले

आंतरराज्यीय टोळी पकडण्यासाठी बिहार, दिल्ली आणि मध्य प्रदेशात अवधुतवाडी पोलिसांनी काही खबरे नेमले आहे. हे पंटर सायबर क्राइमचा एखादा गुन्हा घडला की, पोलिसांना वेळोवेळी मदत करतात. या टोळीला पकडण्यासाठी पंटर त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत होता. त्यामुळे मध्यप्रदेश पोलिसांना हुलकावणी देणारी आंतरराज्यीय टोळी अवधुतवाडी पोलिसांच्या हाती लागली. यात पंटरचीही मदत महत्त्वाची ठरली.