चंद्रपूर : भद्रावती शहराजवळील मानोरा फाटा येथे पोलीस दलाच्या वाहतूक शाखेच्या वतीने लावलेल्या बॅरीकेटला भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिली असता झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला.

मृतकांमध्ये अंकुश सुनील भडगरे (२३) व बावीस वर्षीय मित्राचा समावेश आहे. हा अपघात दुपारी बारा वाजताच्या सुमारास झाला. वरोरा शहरातील रहिवासी असलेला अंकुश व त्याचा मित्र वरोरा येथून रेसर दुचाकीने चंद्रपूरच्या दिशेने निघाले. भद्रावती शहराजवळ पोहोचताच मानोरा फाटा येथे रस्त्याच्या कडेला बॅरीकेट लावण्यात आलेले आहे. या बॅरीकेटला भरधाव वेगात असलेली दुचाकी आदळली.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Thane dog, floor thrown dog feet, damage bike,
ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!

ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील गाडीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे.

Story img Loader