नागपूर : गडकरी यांनी या कर्मचाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान शनिवारी उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. गजानन निखार व विजय पौनिकर या दोन उपोषणकर्त्यांना मेयो मध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : सोलापूरात अजित पवारांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन; इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

हेही वाचा >>> चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ‘सफारी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी पर्यटकांची गर्दी

शनिवारी अधिसंख्य कर्मचा-यांनी संविधान चौक ते गडकरी यांच्या निवासस्थानापर्यत बाईक मिरवणूक काढली. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गडकरी यांना भेटले. यावेळी आमदार विकास कुंभारे, प्रवीण दटके उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी शिष्टमंडळाला त्यांची भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घालून देण्याचे आश्वासन दिले. मागच्याच आठवड्यात हे कर्मचारी गडकरी यांना भेटले होते. आजची ही दुसरी भेट आहे. या पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेतली. सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबास सांगणार असल्याचे म्हटले. सरकार कोणतेही असो तुमच्या मागण्या रास्त आहेत त्यामुळे त्या मान्य व्हायलाच पाहिजे. जर गरज पडली तर एक दिवस आपणासोबत उपोषणास बसणार असे आमदार राजू पारवे म्हणाले.

Story img Loader