नागपूर : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे स्वागत महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर करण्यासाठी युवक काँग्रेसने नागपूर ते तेलंगणा दुचाकी मिरवणूक काढली. ही बाईक रॅली सोमवारी सकाळी तेलंगणात पोहचणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नागपूर : मुंबई, पुणे, औरंगाबादकडे उद्योग न्यायचे थांबवा : आमदार वंजारी

भाजपचे केंद्र सरकार आल्यापासून देशात समाजात द्वेष पसवण्यात येत आहेत. युवकांना रोजगार उपलब्ध करून दिले जात नाही. महागाईवर सरकारचे नियंत्रण नाही. समाजात भेदभाव निर्माण केल्या जात आहे. यासह अनेक मुद्यांवर लक्ष वेधण्यासाठी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आहे. युवक काँग्रेसने या यात्रेचे स्वागत तेलंगणा येथे करण्यासाठी नागपुरातील महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शनिवारी दुचाकी मिरवणूक काढली. ही यात्रा नागपूर शहर युवक काँग्रेसने आयोजित केली असून नागपूर ते तेलंगणा सीमा ५८० किलोमीटर अंतर कापणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांनी दिली.