नागपूर : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे. कच्छ जिल्ह्याच्या जखाऊ बंदरावर ते धडकणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग १५० प्रति तास किमी असेल.
बिपरजॉय चक्रीवादळ आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अरबी समुद्राच्या जाखाऊ बंदरवर धडकेल. १५ जूनच्या सायंकाळपर्यंत हे वादळ जखाऊ बंदराजवळील मांडवी आणि कराची दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छ आणि लगतच्या पाकिस्तानच्या किनारपट्टीला पार करेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळामुळे कच्छसह गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. लष्कर, नौदल, एअरफोर्स व्यतिरिक्त एनडीआरएफच्या १८ चमू तैनात आहेत.
चक्रीवादळामुळे राजकोट विमानतळावर विमानांची उड्डाणं थांबवण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्यात आली आहेत.