नागपूर: झपाट्याने प्रगत होणा-या शहरात समावेश असणा-या नागपुरात अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यानिमित्ताने अनेक उद्याने,सौंदर्यीकरणाची कामे केली जात आहेत. त्यापैकीच एक नागपुरात होऊ घातलेला बर्ड पार्क आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून तो साकारणार आहे.  तो कसा असणार याची कल्पना रविवारी गडकरी यांनी नागपूरच्या बाह्यवळण मार्गांच्या लोकार्पण समारंभात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर – बुटीबोरी व हिंगणा येथील एमआयडीसीला जोडणारा  नवीन बाह्यवळण मार्गावर जामठ्या जवळ हा बर्ड पार्क होतो आहे. नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जामठा हे नागपूर शहरालगतचे गाव असून येथून बाह्यवळण मार्ग जात आहे. तेथील टी पॉइंटवर काही काळ थांबून वाहनधारकांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी बर्ड पार्कचे नियोजन आहे.  यापार्क मध्ये विविध प्रकारच्या फळांची झाडे असतील. पण लोकांना ती खाता येणार नाही. कारण ती फक्त पक्षांसाठी असणार आहे.खुद्द गडकरी यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा >>> सावधान : शेअर ट्रेडिंगच्या नावावर लोकांना लुटणारी टोळी सक्रिय, वृद्धाची २२ लाखाने फसवणूक

असा आहे बर्ड पार्क

जामठा जंक्शनच्या जवळ आठ हेक्टर जागेवर बर्ड पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कचे काम प्रगतीपथावर असून मार्च अखेरीस ते पूर्ण होईल.

.या ठिकाणी  आंबा, चिकूसह अनेक फळांची झाडे असतील.ही फळे फक्त पक्ष्यांसाठी असतील. पार्कमध्ये सायकल ट्रॅक, कॉफी शॉपही असेल. ॲक्सीजन पार्कची सोय केली जाणार आहे

असा आहे आऊटर रिंग रोड या आऊटर रिंग रोडची एकूण लांबी ८४ किलोमीटर आहे. जामठा ते अमरावती रोड, कळमेश्वर रोड, कोराडी रोड, कामठी रोड आणि शेवटी भंडारा पर्यंत हा मार्ग जाणार आहे. त्यापैकी पॅकेज-१ मधील जामठा ते फेटरी हा ३३.५० किलोमीटरचा बायपास आज लोकांच्या सेवेत रुजू झाला. या प्रकल्पाची किंमत ८५६.७४ कोटी एवढी आहे. फेटरीहून पुढे भंडारा येथपर्यंत पॅकेज-२चे काम देखील मार्चच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. रिंग रोडवरील पॅकेज-१ मुळे समृद्धी महामार्गासाठी नागपूर व अमरावती महामार्गाकडून फीडर रुट तयार झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird park in nagpur from the concept of union minister nitin gadkari cwb 76 zws
Show comments