नागपूर : मुंबई मुख्यालयातील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) निसर्गप्रमी व पक्षीनिरीक्षक सदस्यांना पश्चिम बंगालच्या कालिम्पॉंग जिल्ह्यातील निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि लाटपंचार येथे सर्वात आश्चर्यकारक अशा धनेश पक्षिप्रजातीचे साक्षीदार होण्याची दुर्मिळ संधी मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसयटीचे सहयोगी अधिकारी आसिफ खान यांच्या नेतृत्वाखालील गटाने शिबिरात या प्रदेशातील वैविध्यपूर्ण पक्षीजीवनाचा आनंद लुटला आणि लुप्तप्राय ‘रुफस-नेक्ड हॉर्नबिल’सह पक्ष्यांच्या १८० पेक्षा जास्त प्रजातींची नोंद केली. निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यानात समृद्ध जैवविविधता आणि एक अद्वितीय परिसंस्था आहे.

हेही वाचा – माहिती व जनसंपर्क विभागातील पदभरतीत शैक्षणिक अहर्तेचा वाद कायम; पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवीधारकांना अर्ज करण्याची सोय नाही

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मानद सचिव किशोर रिठे यांच्या म्हणण्यानुसार, मध्य हिमालयीन प्रदेश आणि भारताच्या ईशान्य प्रदेशांमध्ये वसलेल्या या प्रदेशात एक अद्वितीय एव्हीयन विविधता आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही भारतातील सर्वात जुनी स्वयंसेवी संस्था आहे, जी १८८३ मध्ये स्थापन झाली आहे आणि ती भारतातील वनस्पती आणि प्राण्यांवर संशोधन, संवर्धन आणि शिक्षणात गुंतलेली आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी १९२७ पासून वन्यजीव प्रेमींचे ज्ञान वाढविण्यासाठी निसर्ग सहली आणि मोहिमा आयोजित करत आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सदस्यांना एप्रिलच्या शेवटी ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य आणि मे २०२३ च्या सुरुवातीला कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आणि पंगोट येथे त्यांची पुढील मोहीम करण्याची संधी मिळेल, असे यावेळी आसिफ खान म्हणाले.