नागपूर : मध्य नागपुरातील नाईक तलाव, बंग्लादेश परिसरात मतदान सुरू असतांना दुपारी काँग्रेस कार्यालयात पैशाच्या पाकीटांसह काही कार्यकर्त्यांना पकडण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. त्यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेत दहा पैशाचे पाकीट जप्त केले. या विषयात काँग्रेस पक्षाकडूनही महत्वाची माहिती दिली. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

पैशाच्या पाकीटाची घटना घडल्यावर या भागात मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते भगवा दुपट्टा घालून जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पाचपावली पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात काही तरुणांकडून पैशाचे पाकीट वाटल्या जात असल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचे दहा पाकीटे जप्त केली गेली. हे तरुण काँग्रेसचे असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
cm Eknath Shindes promise to make Mumbais roads pothole free in two years vanished
मतदान यंत्रांमध्ये फेरफार नसल्याचे शपथ घेणाऱ्या विरोधकांना पटले का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल
Opposition boycotts MLAs oath taking ceremony in Assembly session Voting through EVMs alleged to have been rigged Print politics news
आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार
deputy chief minister validity loksatta
विश्लेषण : ‘उपमुख्यमंत्री’ असे घटनात्मक पदच नाही… मग शपथ घेणे कितपत योग्य? न्यायालय काय म्हणते?
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांची मालमत्ता आयकर विभागाकडून मुक्त; काय आहे नेमकं प्रकरण? पार्थ आणि सुनेत्रा पवार यांनाही दिलासा

हेही वाचा…मेळघाटातील सहा गावांचा मतदानावर बहिष्‍कार, ‘हे’ आहे कारण…

दरम्यान घटनेनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढल्यावर तणाव निवळला. दरम्यान काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी या प्रकरणावर म्हणाले की, मतदानाच्या दिवशी महालमधील सी. पी. ॲन्ड बेरार महाविद्यालयात शासकीय अधिकारी प्रवीण दटके यांच्या फोटोच्या चिठ्ठीवर मतदारांना चिठ्या देत होते. हा प्रकार आम्ही समाज माध्यमांवर टाकला. त्यानंतर छत्रपती महाविद्यालयातही केंद्रीय मंत्री गडकरी यांचे स्विय सहाय्यकांनी हा प्रकार केला. तेही पकडल्या गेल्यावर पुन्हा हे करणार नसल्याचे आम्ही समाज माध्यमांवर टाकले. या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी नाईक तलाव परिसरातील काँग्रेस कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी खिडकीतून हे पैशाचे पाकीट टाकल्याचा आमचा संशय आहे. येथे काँग्रेसकडून साध्या खुर्चा- टेबलांची सोय नसतांना आमच्याकडे पैसे कुठून येणार, हा प्रश्नच आहे. पराभव पुढे दिसत असल्याने भाजपकडून हा प्रकार केल्या जात असल्याचा आरोपही बंटी शेळके यांनी केला.

हेही वाचा…गडचिरोलीत १११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान, तरुण मतदारांना…

मध्य नागपुरात तिरंगी लढत

मध्य नागपुरातून काँग्रेस पक्षाकडून बंटी शेळके तर भाजपकडून प्रवीण दटके उमेदवार आहे. तर हलबा समाजाकडून येथे अपक्ष म्हणून रमेश पुणेकर यांना उभे करण्यात आले आहे. या मतदार संघात सध्या या तिघांमध्ये प्रमुख लढत आहे. मुस्लिम व हलबा बहुल असलेल्या या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचे अनिस अहमद निवडून येत होते. भाजपने येथून हलबा समाजाचे विकास कुंभारे यांना उमेदवारी देत हलबांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मागील पंधरा वर्षांपासून येथून भाजपचे विकास कुंभारे विजयी होत होते.

Story img Loader