स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांनी अटक करण्याची मागणीही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा- नागपूर : उपराजधानीतून आणखी दोन बाळांची विक्री

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका

आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी भाजपा कार्यकर्त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्या विरोधात सावरकर सारख्या महापुरुषाचा अपमान होईल आणि समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. पुढील सात दिवसात जर पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली नाही. तर आम्ही राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी न्यायालयाचे दार ठोठावू असा इशाराही भाजपने यावेळी दिला. यावेळी अर्चना डेहनकर. शिवानी दाणी. धर्मपाल मेश्राम.चंदन गोस्वामी आदी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.