भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी महाविकास आघाडीच्या सभेला भाजपचा विरोध नाही, हे स्पष्ट केल्यानंतरही भाजपचेच आमदार कृष्णा खोपडे यांचा सभेला विरोध कायम आहे. आता त्यांनी स्थानिक नागरिकांना पुढे करुन आंदोलन सुरू केले आहे.
महाविकास आघाडीची नागपूरला १६ एप्रिलला सभा आहे. सभेच्या मैदानावरून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सभेला विरोध केला आहे. मात्र खोपडे यांचा विरोध म्हणजे भाजपचा विरोध असे चित्र लोकांपुढे जात असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी भाजपचा सभेला विरोध नाही असे स्पष्ट केले. पण दुसरीकडे खोपडे माघार घेण्यास तयार नाही. त्यांनी ज्या भागात सभा होणार आहे त्याभागातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन सुरू केले. त्याला पक्षाचे समर्थन असल्याची माहिती आहे. कारण आंदोलनाबाबतची महिती भाजपच्या अधिकृत मीडिया ग्रूपव्दारे प्रसारित केली जात आहे.
हेही वाचा >>>नागपूर: ‘पैसे पाठव, नाहीतर बहिणीचे अपहरण करू…’
दरम्यान हे पक्षाचे आंदोलन नसून स्थानिक नागरिकांचे आंदोलन असल्याचे खोपडे यांनी स्पष्ट केले आहे. , महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्राला लुटण्याचेच काम केले आहे. आघाडीचे सर्व नेते सपशेल खोटे बोलत आहे, असा आरोप खोपडे यांनी केला.