– देशात, राज्यात भाजप सत्तेवर असताना मिनी मंत्रालयात वेगळेच चित्र

वाशीम : जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघांपैकी दोन मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर आहे, मात्र वाशीम जिल्हा परिषदेत भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवारच दिला नाही. यामुळे भाजपचा महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा आहे का?, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे.  नवनिर्वाचित अध्यक्ष ठाकरे यांना देण्यात आलेल्या शुभेच्छापर जाहारीतांवरही  भाजप जिल्हाध्यक्षांचा फोटो झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Uddhav Raj Thackeray meet at family function Mumbai news
उद्धव- राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण; कौटुंबिक कार्यक्रमात भेट
jayant patil Sarcastic speech to rular party on last day of Winter session of the legislature
एक मुख्यमंत्रीही काफी है! इतरांची गरज नाही, जयंत पाटलांची टोलेबाजी
Ajit Pawar On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
ajit pawar visit massajog
शरद पवारांपाठोपाठ आता अजित पवारही मस्साजोगला भेट देणार
elvish yadav reacts on video with hardik pandya ex wife Natasa Stankovic
हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी नताशाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ जाणूनबुजून टाकला? एल्विश यादव म्हणाला, “मी त्यादिवशी…”

हेही वाचा >>> लोकप्रतिनिधींकडून होणारा वाळूचा काळाबाजार खपवून घेणार नाही ; मिनकॉन परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनावले

वाशीम जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे १४, काँग्रेस ११, भाजपचे ७, शिवसेना ६, जनविकास ६, स्वाभीमानी आणि अपक्ष १ असे पक्षीय संख्याबळ आहे. शुक्रवार, १४ ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी तर काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. परंतु त्याविरोधात भाजपकडून कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याने अर्ज दाखल न केल्यामुळे अध्यक्षपदासाठी चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्ष पदासाठी चक्रधर गोटे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. भाजपचे सातही सदस्य सामाजिक बांधीलकीचे असून मात्तब्बर आहेत. त्यांचे प्रस्थ आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पाटणी आणि जनविकासचे अध्यक्ष, माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्यात चांगले संबंध असताना त्यांचा मेळ बसला नाही की बसू दिला नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. 

हेही वाचा >>> राजकीय नेत्यांचा महापालिकेच्या पथकावर दबाव ; नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईत अडथळे

वंचितला सत्तेत घेण्यावरुन काही सदस्यांमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र भाजपातच अंतर्गत गटबाजी असल्यामुळे मिनी मंत्रालयातील नाराजांची मोट बांधण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही, असे बोलले जात आहे. मागील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. परंतु यावेळी मात्र विरोधात असलेली भाजप सामना करेल, असे चित्र होते. परंतु भाजपने लढण्याआधीच मैदान सोडले. तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षांना दिलेल्या शुभेच्छा जाहीरातींवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष झळकत असल्यामुळे भाजपचा ठाकरे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा होता, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. भाजप राज्यात महाविकास आघाडीविरोधात ताकतीने लढत असताना वाशीम जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाले.

Story img Loader