नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही. गेल्यावेळी झाले ते झाले. आता मात्र शरद पवार यांना सुप्रिया सुळे, नाना पटोले यांना मुख्यमंत्री करायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी भाजपला सोडले. उद्धव ठाकरेंना तर भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून मोकळे करतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यानी बदलापूरच्या घटनेवरून विरोधी पक्षावर टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे आता हातपाय जोडत आहे. शरद पवार सुद्धा उद्धव ठाकरेंना कंटाळले आहे. भविष्यात शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री केले नाही असेही उद्धव ठाकरे म्हणतील, काँग्रेसने दिल्लीतून ठाकरे यांना परतून लावले. संजय राऊत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेचे नाव घेत आहेत. मात्र त्यांच्या शब्दाला आता महाविकास आघाडीत किंमत राहिली नाही, असे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : आमदार विकला गेला तर भररस्त्यात फटके मारणार, कोण म्हणाले?
मणीपूर सारखेच महाराष्ट्रात होईल असे शरद पवार म्हणत होते,महाविकास आघाडीचे मनसुबे हे बदलापूर घटनेला धरून मणिपूर करायचे दिसत आहे,अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. बदलापूरच्या घटनेवर महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करीत आहे. आपल्या तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं असे सध्या सुरू आहे. हिंगणघाटमध्ये मुलीला जाळून टाकले, नांदेड, पुणे, साकीनका या ठिकाणी अनेक घटना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडल्या आहेत. त्यामुळे स्वतःच न बघता महाराष्ट्र पेटवण्याचं काम सध्या आघाडीकडून केले जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
म्हणून पवारांना सुरक्षा
शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत आम्हाला आदर आहे. त्यांच्याबाबत कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी त्यांना केंद्राने सुरक्षा दिली. मागील काही काळात अनेक जण नेत्यांना रस्ता रोको करीत असल्यामुळे त्यांना ही सुरक्षा दिली असल्याचे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : Akola Sexual Assault: धक्कादायक! १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, ठार मारण्याची धमकी देऊन…
हर्षवर्धन पाटील यांनी संयम ठेवावा
हर्षवधन पाटील पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे. त्यामुळे त्यांनी संयम ठेवावा. समरजित घाटगे यांनी ज्या जागेवर दावा केला होता ती जागा अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे त्यांची नाराजी आहे. मात्र ज्यांना थांबायचे नाही त्यांना आम्ही थांबवू शकत नाही, असेही बावनकुळे म्हणाले. महायुतीच्या बाबत कितीही अपप्रचार केला तर जनतेला माहित आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, आता मात्र परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येईल असेही बावनकुळे म्हणाले.