वर्धा : भाजपच्या फायर ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या चित्रा वाघ यांच्या संदर्भात एकच चर्चा जिल्ह्यात आहे. चित्रा वाघ या भाजपचे देवळीचे उमेदवार राजेश बकाने यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्यांनी सोमवारी बकाने यांच्या प्रचाराच्या शेवटच्या रॅलीत भाग घेतला. त्यानंतर त्यांनी येथील एक कार्यकर्त्याच्या कुटुंबात निधन झाल्याने सांत्वना भेट दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथून अन्य ठिकाणी गेल्या. तसेच धामणगाव येथील भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या निवासस्थानी पण भेट दिली. म्हणजेच प्रचाराची मुदत आटोपल्यावर पण त्या या भागात होत्या, असे म्हटल्या जाते. निवडणुकीची मुदत आटोपली की बाहेरून जिल्ह्यात आलेल्या नेत्यास जिल्हा सोडून स्वगृही जाण्याचा दंडक आहे. तो चित्रा वाघ यांनी पळाला नाही. अश्या प्रकरणात लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अनिल देशमुख यांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली होती.

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदानाचा टक्का वाढेल, फडणवीसांना विश्वास, कुटुंबासोबत केले मतदान

चित्रा वाघ यांचा असा हा ‘ नियमबाह्य ‘ मुक्काम आता चर्चेत आला आहे. याबाबत निवडणूक कार्यालयास विचारणा केल्यावर उत्तर मिळाले की या बाबीवर कुणी आक्षेप नोंदविले नाही. तसेच तक्रार पण आली नाही. पण अशी शक्यता असल्यास चौकशी करण्यात येईल. तथ्य तपासून निर्णय घेऊ. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर म्हणाले की प्रचार नाही करता येत, पण मुक्काम करता येतो अशी धारणा आमची आहे. चौकशी करतो.

तर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट म्हणाले की चित्रा वाघ यांच्या सोबतच मी पुलगाव येथील रॅलीत होतो. त्यानंतर एका कार्यकर्त्याकडे गेलो. चित्रा वाघ या स्वतःच्या गाडीने आल्या असल्याने मी त्यांना समृद्धी मार्गा पर्यंत सोडून दिले. त्यानंतरची अपडेट मला माहित नाही. वाघ यांच्या मुदती नंतरच्या मुक्कामाबद्दल मात्र जोरात चर्चा होते. निवडणूक कार्यालय या अनुषंगाने करीत असलेल्या तपासणी नंतरच खरं ते काय चित्र स्पष्ट होवू शकेल.

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गडकरींचे सहकुटुंब मतदान, म्हणाले ” यंदा विकास…”

मात्र नेत्यांचा दौरा हा नेहमीच चर्चेचा भाग ठरत आला आहे. गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांचा वर्ध्यात दौरा होता. पण तो वेळेवर रद्द झाला. पण तयारी तर झाली म्हणून वेळेवर भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या दौऱ्याचे आयोजन झाले. महिला नेत्या सभा गाजवीत असल्याने मग चित्रा वाघ यांना प्रचाराच्या शेवटच्या रॅलीत बोलाविण्यात आले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chitra waghs illegal stay is being discussed in wardha district pmd 64 sud 02