विधानसभेच्या निवडणुका होऊन आता एक महिन्याच्या कालावधी लोटला असून अजूनही जिल्ह्य पालकमंत्री पदाचा तिढा कायम असून आता नवीन वर्षातच याचा फैसला होणार हे उघड आहे. दरम्यान जिल्ह्यात पुन्हा मोठा भाऊ म्हणून सिद्ध झालेल्या भाजपचा पालकमंत्री म्हणून भरभक्कम दावा असला तरी दोन्ही मित्र पक्षही इच्छुक असून या महत्वाच्या पदावर नजर ठेवून आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) या मित्र पक्षातील रुसवे फुगवे, अंतर्विरोध, समन्वयाचा अभाव यामुळे सरकार स्थापन होण्यास विलंब झाला. पहिल्या टप्प्यात केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली.यानंतर गृह आणि अन्य मलाईदार खात्यावरून मंत्री मंडळ विस्तार रखडला. एकदाचा मंत्री मंडळ विस्तार झाला पण खाते वाटप रखडले. आता पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे. निवडणुकीला एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही बुलढाण्यासह अन्य जिल्ह्याचे पालक अजूनही ठरले . आज सरत्या वर्षाने निरोप घेतला असल्याने आता नवीन वर्षातच पालकमंत्री मिळणार असे चित्र आहे. बीड आणि परभणी जिल्ह्यातील घडामोडी मुळे नवीन वर्षातही पालकांची नियुक्ती लवकर होणार नाही असे विचित्र चित्र आहे.
हेही वाचा >>> शाळेतच दारू आणि अनागोंदी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांची नोटीस, संस्थाचालक म्हणतात ….
फुंडकरांची दाट शक्यता पण…
दरम्यान विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील ७ पैकी वाट्याला आलेल्या चारही जागा जिंकून भाजपने आपली ताकद आणि प्रभुत्व सिद्ध केले. निवडणुकीपूर्वी फार्मात असलेल्या शिवसेना शिंदे गटाला तीन पैकी बुलढाण्याची एकच जागा तीही केवळ ८४१ मतांनी राखता आली. मेहकरात माजी आमदार संजय रायमूलकर तर सिंदखेडराजा मध्ये शशिकांत खेडेकर पराभूत झाले. अजितदादा गटाने चमत्कार करीत सिंदखेडराजा मध्ये विजय मिळवला. या तुलनेत भाजपने खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर आणि चिखली या चार ठिकाणी बाजी मारली. धक्का तंत्र साठी प्रसिद्ध भाजपने ऐनवेळी खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना कॅबिनेट मंत्री पद बहाल केले.
हेही वाचा >>> नागपूर पोलिसांना झाले तरी काय ? चोऱ्या घरफोड्या वाढल्या…
यामुळे भाजपचा बुलढाणा जिल्हा पालकमंत्री पदावर जोरकस दावा आहे. त्यातच शेजारील अकोला जिल्ह्याला मंत्रिमंडळ मध्ये संधी नाकारण्यात आली आहे. यामुळे कामगार मंत्री आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्ह्याचे पालक राहण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिपदा सारखीच त्यांना अकोला जिल्ह्याचेही पालकमंत्री म्हणून लॉटरी लागू शकते. त्यांचे पिता दिवंगत पांडुरंग फुंडकर यांनी अकोल्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले असून त्यांना मानणारा मोठा वर्ग तिथे आहे. त्यामुळे आकाश फुंडकर यांना पालक पदाचा दुहेरी मान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र महायुती मधील सुंदोपसुंदी, लाथाळ्या, वर्चस्वाची लढाई लक्षात घेता हे वाटते तितके सोपे नाही. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट देखील पालकमंत्री पदावर नजर ठेवून आहे. महाआघाडीच्या सरकार मध्ये शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे पालकमंत्री राहिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा लढतीत शिंदे गटाची झालेली वाताहत, दुफळी, खासदार प्रतापराव जाधव विरुद्ध बुलढाणा आमदार संजय गायकवाड असा उघड संघर्ष लक्षात घेता एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी ने दीर्घ काळ बुलढाण्याचे पालकत्व सांभाळले आहे.राजेंद्र शिंगणे हे दीर्घ काळ पालकमंत्री राहिले आणि त्यांच्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी ही धुरा सांभाळली. दुसरीकडे २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर आणि शेवटच्या टप्प्यात संजय कुटे हे पालक राहिले आहेत. यामुळे पालकमंत्री पदाचा गुंता वाटतो तितका सोपा नाही हे उघड आहे.हा गुंता कधी सुटतो आणि जिल्ह्याला पालक कधी मिळतो हा मुद्धा ऐरणीवर आला आहे. वरकरणी वाटते तसं आकाश फुंडकर पालकमंत्री होतात की ऐनवेळी धक्कातंत्रचा वापर होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.