नागपूर : शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपच्या विधि सेलच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. सेलचे महानगर अध्यक्ष ॲड. परीक्षित मोहिते यांनी ही तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा हात असल्याचा आरोप केला.

हेही वाचा >>> काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचा गंभीर आरोप, निवडणूक रोखे खरेदीशी संबंधित कंपनीला कंत्राट?

case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ganesh Naik announcement create unease in Shiv Sena
ठाण्यात फक्त कमळ ! गणेश नाईकांच्या घोषणेने शिवसेनेत अस्वस्थता
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप
Pune, Crime, Cop-24 , Police Patrol,
पुणे : रस्त्यांवरील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘कॉप – २४’, पोलिसांकडून आता अहोरात्र गस्त; ७२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
youth attacked over parking dispute in pune
पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; तरुण गंभीर जखमी, बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील घटना
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
Kerala woman sentenced to death for poisoning her boyfriend
प्रियकराला विष दिल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा; कोण आहे ग्रीष्मा एसएस? नेमके प्रकरण काय?

तसेच भाजप व भाजपचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम देशद्रोही असल्याचा आरोपदेखील वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केला असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली असून ती तक्रार मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया सीताबर्डीचे ठाणेदार आसाराम चोरमोले यांनी दिली.

Story img Loader