नागपूर : कोराडीत प्रस्तावित नवीन वीज प्रकल्पाबाबत सोमवारी आयोजित जनसुनावणीत काँग्रेस-भाजप समर्थक समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. दोन्ही पक्षांकडून सुनावणीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए.एम. खरे आणि उपप्रादेशिक अधिकारी यू.बी. बहादुरे यांनी कोराडीत प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या नवीन प्रकल्पावर जनसुनावणी सुरू केली. प्रथम महानिर्मितीकडून प्रकल्पाच्या समर्थनाथ भूमिका मांडली गेली. त्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे राज्य महासचिव विशाल मुत्तेमवार यांनी प्रकल्पाला विरोध दर्शवला.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
BJP leader former MP Navneet Ranas campaign vehicle get viral in Amravati
नवनीत राणा म्‍हणतात, “…त्या नेत्यांचा हिशेब करा”, प्रचार वाहनाची जोरदार चर्चा
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

हेही वाचा >>> प्रेयसीच्या भावाचा फोन आला अन् घोळ झाला; मारहाणीच्या भीतीने अल्पवयीन प्रेमीयुगुलाचे पलायन

मुत्तेमवार म्हणाले, महानिर्मितीकडून राज्यातील इतर भागात प्रकल्प बंद करून केवळ नागपुरात १,३२० मेगावॅटच्या प्रकल्प उभारण्याला आमचा विरोध आहे. नवीन प्रकल्पामुळे आरोग्याच्या काय समस्या उद्भवणार हे स्पष्ट झालेले नाही. छत्तीसगडच्या गरेपाल्मातून कोळसा आणून येथे वीज तयार करण्यापेक्षा तेथेच हा प्रकल्प करून वीज राज्यात आणणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असल्याचे मुत्तेमवार म्हणाले. आमदार विकास ठाकरे म्हणाले, नांदगावात राखेची गंभीर समस्या असून कोलार नदीतून ही राख कन्हान नदीत येते. येथील पाण्याचा नागपुरात पुरवठा होत असल्याने ती राख घरोघरी जाते. ही समस्या कायम असतानाच आता नवीन प्रकल्पाद्वारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकले जात आहे. पूर्वीच्या संचातील प्रदूषणाची समस्या सोडवल्यावरच या प्रकल्पाला समर्थन देण्याची भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसचे राज्य सचिव संदेश सिंघलकर म्हणाले, या सुनावणीबाबत नागपूर महापालिका, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाला माहिती दिली गेली नाही. रेडिओ-दूरचित्रवाणीवर सूचना दिली गेली नाही. अशा छुप्या पद्धतीने सुनावणी घेणे चुकीचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुनावणीत नागरिक बोलत असताना काँग्रेसचे नेते-पदाधिकारी बाहेर पडले. त्याचवेळी भाजप समर्थकांनी कोराडीतच प्रकल्प व्हायला पाहिजे, अशा घोषणा दिल्या. त्यावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिले. वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करून बंदोबस्त वाढवल्याने तणाव निवळला. परंतु काँग्रेस पदाधिकारी खोके सरकार मुर्दाबादचे नारे देत सुनावणीतून बाहेर पडले, तर भाजप समर्थकांनी काँग्रेस मुर्दाबादचे नारे दिले.

१३ ग्रामपंचायतींचा पाठिंबा- रंगारी

जनसुनावणीत राजेश रंगारी म्हणाले, नवीन प्रस्तावित प्रकल्प सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या उद्भवणार नाही. म्हणून १३ ग्रामपंचायतींकडून पाठिंबा देत आहोत. शुभम आवरकर म्हणाला, प्रकल्पात शेती गेली. कुटुंबातील एकाला नोकरीही मिळाली. आता घरात बेरोजगारी असून प्रकल्पातून रोजगार मिळणार असल्याने हा प्रकल्प करण्याची मागणी त्याने केली. आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाचे बाळू घरडे यांनीही प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाबाबतच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी करत प्रकल्पाला समर्थन दिले. सचिन पाटील यांनी प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार देऊन तेथे परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेणार नसल्याचे सांगितले. धनंजय इंगोले यांनी हा प्रकल्प इतरत्र न्यायचा असल्यास आधीच्या प्रकल्पासाठी अधिग्रहित जागा परत करण्याची मागणी केली. दिशा चनकापुरे यांनी प्रकल्पास समर्थन असल्याचे सांगत तेथे प्रदूषण होणार नाही, अशी काळजी घेण्याची मागणी केली. योगिता दांडे यांनीही प्रकल्पाला समर्थन दिले.

जिल्हाधिकारी साहेब, विहिरीतील पाणी पिऊन बघा- रोंघे

राज्यातील ७० टक्के वीज विदर्भात तयार होत असून येथे तयार होणाऱ्या विजेपैकी केवळ ११ टक्केच वापर होतो. जगात कुठेही ३० लाखांच्या शहराला लागून औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प नाही. येथे आरोग्य, पाणी, वायू प्रदूषण गंभीर असतानाही नवीन प्रकल्प करणे धोकादायक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बाटलीबंद पाण्याऐेवजी येथील विहिरीचे पाणी पिल्यास त्यांना प्रदूषणाची भीषणता लक्षात येईल, असे महाविदर्भ जनजागरणचे नितीन रोंघे म्हणाले. विवेकसिंग सिसोदिया यांनी मुलांना प्रदूषणापासून वाचवण्याची मागणी केली. लीना बुद्धे यांनी महानिर्मितीने प्रकल्पासाठी केलेल्या आरोग्यासह इतर अभ्यासांवर आक्षेप घेतला. हा खोटा अहवाल तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी त्यांनी केली. अनुसूया छाबराणी यांनी कोराडी तलावात मासेमारीच बंद झाल्याकडे लक्ष वेधले. प्रताप गोस्वामी यांनी महानिर्मितीच्या दाव्यावर कसा विश्वास ठेवावा, हा प्रश्न उपस्थित करत प्रकल्पाला विरोध केला.

कन्हान नदीवर नियमबाह्य पिल्लर- प्रकाश जाधव शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार प्रकाश जाधव प्रकल्पाला विरोध करत म्हणाले, महानिर्मितीने नियम धाब्यावर बसवून कन्हान नदीवर कोळसा वाहून नेण्यासाठी पिल्लर बनवले. चौकशी केल्यास अनेक अधिकारी कारागृहात जातील. प्रकल्पासाठी कोळसा खाण आणि ते वाहून जाणाऱ्या भागात प्रचंड प्रदूषणाची समस्या आहे. प्रकल्पातून निघणाऱ्या विषारी वायूचा केवळ १० किलोमीटर परिघात परिणाम नसून मोठ्या परिघात तो होतो, असेही ते म्हणाले. विशाल बरबटे आणि गोडबोले यांनीही आपले मत मांडले.