नागपूर : लोकांना आता कळून चुकले आहे की, शिवसेना पक्षाला संपवण्याचे षडयंत्र भाजपचे आहे. आता हीच जनता रस्त्यावर उतरून केंद्राची हुकूमशाही मोडून काढेल, असे काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी नागपुरात बोलत होते. ईडीचा दुरुपयोग मोदी सरकार राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी करीत आहे. हे लोकांनाही कळू लागलेले आहे आम्हाला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये त्याविषयी लोक चर्चा करताना दिसतात. ईडीचा वापर ज्या पद्धतीने भाजपविरोधात बोलणाऱ्याविरुद्ध केला जात आहे ते योग्य नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारचे दडपशाहीचे धोरण असेच सुरू राहिल्यास हळूहळू जनताच यांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असेही आमदार वंजारी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बिहारच्या पटनामध्ये सोमवारी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, महाराष्ट्रात किंवा देशामध्ये फक्त भाजपच आहे, असा गैरसमज कोणीही करून घेण्याचे काहीच कारण नाही. काँग्रेस संपूर्ण देशात असून हा पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभा राहत आहे. भाजप विरोधी पक्षाला संपवून लोकशाही संपवण्याच्या प्रयत्नात आहे, त्यांचे हे षडयंत्र लोकांसमोर काँग्रेस मांडेल. लोकांना त्याची चांगली कल्पना आहे की, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना कशासाठी तुरुंगावासात घालण्यात आले आहे, असेही वंजारी यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात केंद्र सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. महागाई, बेजरोगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या सिलिंडरचे दर अनेक पटीने वाढले आहेत. दूध, दही आणि कोंथिबीर यासारख्या वस्तूवर देखील वस्तू व सेवा कर आकारण्यात येत आहे. सामान्य माणूस आणि गृहिणी संतापल्या आहेत. त्यांचा संताप उफाळून येईल आणि दिल्लीतील हुकूमशहांना जनता सळो की पळो करून सोडेल, असा इशाराही त्यांनी दिला.